Share

जेवणाचे १० हजार बिल मागितले म्हणून राडा, मालकाला रक्तबंबाळ करून कामगारांच्या अंगावर घातली कार

संभाजीनगरमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने एका टोळक्याने हॉटेल मालकाला मारहाण करत कामगारांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.

Published On: 

Chhatrapati Sambhajinagar police investigating crime at Yashwant Hotel

Yashwant Hotel: हॉटेलमध्ये जेवणाचे दहा हजार रुपये बिल मागितले, म्हणून थेट मालकाला बेदम मारहाण करत कामगारांच्या अंगावर चक्क कार घालण्याचा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. एका किरकोळ वादातून या तरुणांनी हा जीवघेणा हल्ला केला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ही घटना शहरातील झाल्टा फाटा येथील ‘यशवंत’ हॉटेलमध्ये ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी हॉटेल मालक केदार बद्री शिंदे (वय २४) यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश तरटे, संकेत पवार, मुकेश दाभाडे, विशाल सावंत आणि नंदू तांबे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

१० हजारांच्या बिलावरून वाद अन् ‘यशवंत’ हॉटेलमधील घटनाक्रम

रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास महेश तरटे हा त्याच्या चार मित्रांसोबत ‘यशवंत’ हॉटेलमध्ये जेवायला आला होता. जेवण आटोपल्यावर केदार यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांचे बिल मागितले. त्यावर महेशने दादागिरी करत ‘मी बिल देणार नाही, तुला जे करायचं ते कर’ असा दम भरला. पाहता पाहता या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सोबत असलेल्या संकेत पवारने ‘याला धरून मारा’ असं म्हणताच टोळक्याने केदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

स्वतःचा बचाव करण्यासाठी केदार हॉटेलच्या बाहेर पळाले. तिथे महेशने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडका मारला, ज्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. मालकाला वाचवण्यासाठी हॉटेलमधील कामगार नफिस सिद्दीकी, पवन पासवान आणि केदारचा भाऊ सुमित हे धावून आले. मात्र, आरोपींनी नफिसलाही दांडक्याने मारहाण केली.

हाणामारीनंतर तिथून पळून जाताना या टोळक्याने त्यांच्या विना नंबर प्लेटच्या पांढऱ्या फ्रॉन्क्स (Fronx) कारने सुमित आणि पवन यांच्या अंगावर गाडी घातली. या धडकेत हे दोघे जखमी झाले आहेत. तिथून जाताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत, ‘तुला आता जिवंत सोडत नाही’ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही