रिक्षाचालकांना मुदतवाढ देण्यावर शिंदे नाराज? आशिष शेलारांनी चर्चाच फेटाळली

आशिष शेलार यांनी अमराठी रिक्षाचालकांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा फेटाळली.

Published On: 

Ashish Shelar speaking to media

Ashish Shelar : मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या काळात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी एकमेकांना मिठाई वाटून या निर्णयाचे स्वागत केले.

मात्र, मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis) यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. तरीही, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजीबाबतच्या या चर्चांचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खंडन केले आहे.

मंत्री आशिष शेलार यांनी सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, “गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा (ASHA) कार्यकर्त्यांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा मला बहुमान मिळाला आहे. माझ्या या भगिनी खूप चांगले काम करतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवून मला आनंद होतो.”

Ashish Shelar on Eknath Shinde 

उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावताना शेलार म्हणाले, “त्यात कोणतीही नाराजी नाही. मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर मंत्र्यांचा त्याला होकारच होता. टॅक्सी चालकांना वेळ देणं हे सर्वसमावेशकच आहे.”

मराठी न आल्यास चालकांना फटकवणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मराठीचा आग्रह आमचा पण आहे. मराठी शिकलं पाहिजे, यासाठी तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही झाली? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कारटे. आम्ही सगळ्यांना वेळ दिलाय, कायदा हातात घेता कामा नये. तुमच्या काकांनी का केलं नाही, असा प्रश्न त्यांनी विचारावा किंवा कांग्रेसला विचारावा.”

महापौरपद हे पुढील अडीच वर्षांसाठी शिंदे गटाला मिळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. यावरही आशिष शेलार यांनी भाष्य केले. “शिंदे आमचे नेते, ते अनौपचारिक बोलले असतील, तर मी औपचारिक का बोलावे? मुख्यमंत्री आणि त्यांचे बोलणे झालं असेल, तर माहिती नाही”

मराठा आंदोलनावर आशिष शेलार म्हणाले, “मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांना त्यांचा अधिकार मिळायलाच हवा. सरकार अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. काही गोष्टी राहिल्या असतील तर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री बोलले आहेत”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही