‘अंडी फेकत असाल तर ईद येतेय लक्षात ठेवा’; गणेश मिरवणुकीवरून नितेश राणेंचा इशारा

माझगाव मोरया गणपती मिरवणुकीवर अंडी-दगडफेकीच्या आरोपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ‘ईद येतेय’ असा इशारा दिला.

Published On: 

Nitesh Rane on Ganeshotsav

मुंबई : गणेशोत्सव अगदी जवळ आला असताना, काल मुंबईत गणेशाच्या (Ganeshotsav) आगमनानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. काल अनेक प्रमुख मंडळांच्या गणेशमूर्तींची मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र, ‘माझगाव मोराया गणपती मंडळा’च्या आगमन मिरवणुकीदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

‘कॉन्टिनेंटल हाइट्स’ या टॉवरवरून मिरवणुकीवर अंडी आणि दगड फेकण्यात आल्याचा आरोप माझगाव मोराया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संताप व्यक्त केला आहे. “अंडी फेकण्याचे प्रकार होत असतील तर ईद येतेय हे लक्षात ठेवा.” असा इशारा राणे यांनी दिला.

Nitesh Rane on Ganeshotsav

“आमचे हिंदू सण सहन होत नसतील, ज्या देशात ९० टक्के हिंदू राहतात. हिंदू राष्ट्रात राहून हिंदू सणांवर गणेशोत्सवावर, मिरवणुकीवर दगडफेक, अंड फेकीचे प्रकार होत असतील तर पोलीस कारवाई करतीलच, केली पण आहे. सगळ्या केसेस घेतल्या आहेत.” असे नितेश राणे म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले की, “हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार असताना आम्ही हे प्रकार सहन करणार नाही. अशा पद्धतीने अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांविरोधात होत असतील, गणेश मिरवणुकीच्या बाबतीत हे घडत असेल, तर ईदपण कुठेतरी येत आहे हे लक्षात ठेवा”

“मोहरमचा दिवस पण येईल. धर्म रक्षणासाठी आमच्या भगवद्‌ गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची सुद्धा मुभा दिलीय, हे लक्षात ठेवा. कायद्याचे पालन करण्याचा ठेका हिंदुंनी घेतलेला नाही.” असा इशारा राणे यांनी दिला आहे.

“सर्व धर्म समभाव, सेक्युलर, फेक्युलर हे जे कोण टेपरेकॉर्डर आहेत ते कुठल्या बिळात लपले आहेत? अशा पद्धतीने हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने, जिहादी ज्या बिल्डिंगमध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे त्यांची नावे आलेली आहेत. पुढे बघा कसा कार्यक्रम होतो.” असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही