Share

Varanasi Airport Firing: प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली; कडेकोट सुरक्षेत नेमकं काय घडलं?

वाराणसी विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग दरम्यान मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या परवानाधारक पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

Published On: 

Varanasi Airport Firing security check at airport with police investigation

Varanasi Airport Firing: विमानतळावर कडेकोट सुरक्षा असतानाही अचानक गोळीबाराचा आवाज घुमला तर काय अवस्था होईल? रविवारी सकाळी वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर असाच एक धक्कादायक प्रकार घडला. आणि क्षणार्धात एकच मोठी खळबळ उडाली.

आझमगडचे ५५ वर्षीय रहिवासी कमलेश राय हे पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-1810) विमानाने मुंबईला जाणार होते. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं परवाना असलेलं (लायसन्सड) पिस्तूल होतं. प्रवासापूर्वी त्यांनी विमानतळ प्रशासनाला रीतसर त्याची माहितीही दिली होती. पण… सिक्युरिटी चेकिंगच्या वेळी पिस्तुलाची तपासणी करत असतानाच अचानक त्यातून गोळी सुटली. या भयानक चुकीमुळे AAICLAS चे दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

Varanasi Airport Firing: नेमकी कशी घडली घटना

शस्त्र आणि गोळ्यांची तपासणी सुरू असतानाच हा अपघात झाला. अचानक सुटलेली गोळी जमिनीवर आदळली आणि तिचे तुकडे उडाले. यामुळे एका महिला कर्मचाऱ्याच्या पायाला (मांडीला) गंभीर दुखापत झाली. तर दुसरीकडे… तिथेच उभ्या असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या अंगठ्यालाही मार लागला. या दोन्ही जखमींना लगेच उपचारांसाठी ‘न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटर’मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस दल ॲक्शन मोडवर आलं. गोमती झोनचे डीसीपी आणि पिंडराचे एसीपी तातडीने तिथे पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून योग्य ती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही