Share

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट तिप्पट वाढ? १८ हजारांवरून ६९ हजारांच्या आकड्यामागचं गणित काय?

कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगात मूळ वेतन ६९ हजार रुपये करण्याची मागणी केली असून, ३.८३३ फिटमेंट फॅक्टरचा नवा प्रस्ताव चर्चेत आला आहे.

Published On: 

8th Pay Commission - Government employees salary hike and fitment factor details.

सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी लवकरच एक मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तुमचा मूळ पगार (Basic Pay) १८ हजार रुपयांवरून थेट ६९ हजार रुपयांवर पोहोचला तर? ऐकायला थोडं अशक्य वाटत असेल, पण सध्या याच नव्या गणिताने देशातील कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे पगारवाढीचा एक नवा आणि भक्कम प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जुन्या फॉर्म्युल्यावर अवलंबून न राहता महागाई आणि कुटुंबाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही ६९ हजारांची मागणी करण्यात आली आहे.

8th Pay Commission

आतापर्यंत वेतन निश्चित करताना नवरा-बायको आणि दोन मुलं असं तीन जणांचं कुटुंब गृहीत धरलं जायचं. पण आता राष्ट्रीय परिषद- संयुक्त सल्लागार यंत्रणेने (NC-JCM) यात मोठा बदल सुचवला आहे. आता या कुटुंबात आई-वडील आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

त्यामुळेच, कुटुंबाचा आकार वाढल्याने घरभाडे, रेशन, वीज, पाणी आणि इंधनाचा खर्चही वाढला आहे, असा थेट युक्तिवाद कर्मचारी वर्गाने केला आहे. वाढत्या महागाईच्या काळात पगारवाढीचं जुनं सूत्र अजिबात पुरेसं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दुसरीकडे, या नव्या गणितानुसार फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) ३.८३३ इतका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर २.५७ होता. आता तज्ज्ञांच्या मते, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो २.१५ च्या आसपास राहू शकतो. पण, औद्योगिक कामगारांच्या महागाई निर्देशांकानुसार (AICPI-IW) कामगार संघटनांनी ३.८३३ ची मागणी लावून धरली आहे.

सरकारने जर हा नवा प्रस्ताव आणि वाढीव फिटमेंट फॅक्टर मान्य केला, तर खरंच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जॅकपॉट ठरू शकतो. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही