Share

‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल असा कट: पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेह १५ फूट खड्ड्यात पुरला

जामनगरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची सायनाइड देऊन हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारखान्यात गाडून दोन वर्षे पती ऑस्ट्रेलियात असल्याचे खोटे सांगितले.

Published On: 

Cyanide Jamnagar Murder Case police investigation factory site

जामनगर: एखादा माणूस दोन वर्षे गायब असतो आणि तरीही कुणालाच संशय येत नाही? विचार करूनच अंगावर काटा येतो ना. गुजरातच्या जामनगरमध्ये अगदी असंच घडलंय. एका पत्नीने ‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल असा भयानक कट रचला.

जामनगरमधील पृथ्वी नावाच्या महिलेने तिचा पती जिग्नेश याची निर्घृण हत्या केलीय. प्रियकराच्या मदतीने तिने पतीला चक्क सायनाइड पाजलं. त्यानंतर त्याचा मृतदेह तब्बल १५ फूट खोल खड्ड्यात पुरला.

Jamnagar Murder Case: एका प्रश्नाने उघड झालं भयानक सत्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचे निलेश मनसुखभाई कचेटिया याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पती जिग्नेश त्यांच्यात अडसर ठरत होता. त्यामुळेच त्यांनी त्याला संपवण्याचा प्लॅन बनवला. दारूतून सायनाइड देऊन त्यांनी जिग्नेशचा कायमचा काटा काढला.

हत्येनंतर त्यांनी दरेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात खोल खड्डा खणला. तिथे मृतदेह गाडला. त्यानंतर पृथ्वीने सासरच्यांना एक मोठी थाप मारली. जिग्नेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेलाय. तिथे कंपनीत मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे, असं ती सतत सांगायची. कुटुंबीय त्यावर विश्वास ठेवून दोन वर्षे वाट पाहत राहिले.

दुसरीकडे, जिग्नेशचा भाऊ अशोक ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत होता. त्याने वहिनीकडे जिग्नेशच्या कंपनीचा पत्ता मागितला. तिथे गेल्यावर आपण त्याला नक्की भेटू, असं तो म्हणाला. इथेच पृथ्वीची मोठी अडचण झाली. ती पत्ता देण्यास सतत टाळाटाळ करू लागली.

या प्रकारामुळे दीराचा संशय बळावला. त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मात्र पृथ्वी प्रचंड घाबरली. तिने अखेर आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने कारखान्यात खोदकाम केलं. तिथे १२ ते १५ फूट खोल खड्ड्यातून जिग्नेशचा सांगाडा बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही