Share

Ketan Agrawal Case : लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सिया-चेतनच्या गुप्त लग्नाचा दावा

लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला असून, WhatsApp चॅटमधून महत्त्वाचे पुरावे समोर आल्याची माहिती आहे.

Published On: 

Ketan Agrawal Case

🕒 1 min read

पुणे : लोहगड हत्या प्रकरणाच्या (Lohgad Murder Case) तपासात दररोज नवे खुलासे होत आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला होता, असा दावा पोलिसांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपींच्या मोबाईलमधील WhatsApp चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या (Digital Proof) तपासातून ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp चॅटमधून समोर आली लग्नाची माहिती

पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाईल फोनची सखोल तपासणी केली असता, अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागले. विशेषतः WhatsApp चॅटमधून सिया आणि चेतन यांनी काही महिन्यांपूर्वी गुप्तपणे लग्न (Secret Marriage) केल्याचे समोर आले आहे, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. या पुराव्यांची पडताळणी सुरू असून, त्यावरून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.

कुटुंबीयांपासून लपवले होते लग्न

तपासादरम्यान, आरोपींची चौकशी, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि इंटरनेट सर्चचा अभ्यास करण्यात आला. त्यातून सिया आणि चेतन यांनी कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता विवाह केल्याचे समोर आले. हा विवाह केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या १९ फेब्रुवारीला झालेल्या साखरपुड्याच्या आसपास झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हा विवाह साखरपुड्यापूर्वी झाला की नंतर, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही.

गुन्ह्यापूर्वी वेब सिरीज आणि पॉडकास्टचा अभ्यास?

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी अनेक वेब सिरीज, पॉडकास्ट आणि देशातील विविध खुनांच्या घटनांचा अभ्यास केल्याचा पोलिसांचा दावा आहे. चौकशीतून आणि डिजिटल पुराव्यांतून आरोपींनी गुन्हा कसा करावा, संशय कसा टाळावा आणि पुरावे मागे कसे राहू नयेत, याबाबत इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात माहिती शोधल्याचे समोर आल्याचे सांगितले जात आहे.

शस्त्राऐवजी कड्यावरून ढकलण्याचा निर्णय

पोलिसांच्या दाव्यानुसार, आरोपींनी चाकू किंवा इतर शस्त्र वापरल्यास पुरावे राहण्याची शक्यता अधिक असल्याचे लक्षात घेऊन वेगळा मार्ग निवडला. कोणतेही शस्त्र वापरायचे नाही आणि अपघाताचा आभास निर्माण करण्यासाठी उंच कड्यावरून ढकलण्याचा कट रचल्याची माहिती चौकशीतून समोर आले आहे. याची पडताळणी तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

१८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल यांना खाली ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या मोबाईलमधील डिजिटल पुरावे, WhatsApp चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल तपासणी सुरू आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील नवे पैलू समोर येत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही