Share

IND vs ZIM: संजू सॅमसन OUT! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले आहे.

Published On: 

IND vs ZIM

IND vs ZIM: इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, संघनिवडीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सर्वाधिक चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे संजू सॅमसनला (Sanju Samson) संघातून वगळणे.

संजू सॅमसन हा आयर्लंड (Ireland) आणि इंग्लंड (England)दौऱ्यावर भारताच्या टी20 संघाचा सदस्य होता. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी देण्यासाठी त्याला अंतिम अकरातून बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही त्याची निवड न झाल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, युवा खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने निवड समितीने काही नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच तिलक वर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा टी20 संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा आणि मयंक यादव.

भारत-झिम्बाब्वे टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20: 23 जुलै 2026 – हरारे
दुसरा टी20: 25 जुलै 2026 – हरारे
तिसरा टी20: 26 जुलै 2026 – हरारे
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही बदल

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघातही एक बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी संघाबाहेर गेला असून त्याच्या जागी शिवम दुबे याची निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि शिवम दुबे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही