Share

Pune Crime : १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी, पण नात्यातच दडलं होतं हत्येचं रहस्य

लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे. होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कट रचल्याचा संशय असून दोघांची चौकशी सुरू आहे.

Published On: 

Crime News

🕒 1 min read

पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) घडलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला हा ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल (Ketan Agrawal) आणि सिया गोयल  (Siya Goyal) यांचा विवाह निश्चित झाला होता. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह होणार होता. या लग्नासाठी जयपूरमध्ये सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्थाही करण्यात आली होती.

१८ जून रोजी सियाच्या वाढदिवसानिमित्त केतन आणि सिया लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. याचवेळी कट रचून केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. फोटोसाठी पोज देत असताना त्याला दरीत ढकलण्यात आले आणि त्यानंतर अपघाताचा बनाव करण्यात आल्याचा तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर सियाने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि केतन पाय घसरून दरीत पडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना तिच्या हालचाली आणि घटनाक्रमावर संशय आला. मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि चौकशीतून या प्रकरणातील धागेदोरे समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि तिच्या प्रियकराने मिळून हा कट रचल्याचा संशय आहे. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही