🕒 1 min read
नाशिक : नाशिक विधान परिषद (Vidhan Parishad Election) स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीत धक्कादायक कल समोर येत आहेत. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले गोकुळ गीते (Gokul Geete) यांनी पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या फेरीतील १५० मतांपैकी गोकुळ गीते यांनी १०० हून अधिक मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांच्या या आघाडीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह इतर उमेदवारांची चिंता वाढली आहे.
मतमोजणीपूर्वी गोकुळ गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, “मी केवळ प्रचार थांबवला होता, निवडणुकीतून माघार घेतली नव्हती. मतदारांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विजयाबाबत मला विश्वास आहे.”
पहिल्याच फेरीतील आकडे समोर आल्यानंतर गोकुळ गीते यांच्या दाव्याला बळ मिळताना दिसत आहे. त्यांच्या आघाडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीमध्ये मतफुटी किंवा क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निकालाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून अंतिम निकालानंतर नाशिकच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- AIineducation : शिक्षणात डिजिटल क्रांती! महाराष्ट्रातील 4 लाख शिक्षकांना मिळणार गुगलचे ‘एआय’ प्रशिक्षण
- Zelensky Returns Polish Honour: दुसऱ्या जागतिकयुद्धाच्या इतिहासावरून वाद पेटला; वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पोलंडचा सर्वोच्च सन्मान परत केला
- ‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे…’; भर लग्नात जया बच्चन आणि संजय राऊतांचा ‘तो’ मराठी संवाद चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












