Share

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?

लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana scheme fund distribution and beneficiary updates

🕒 1 min read

मुंबई – लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार या चिंतेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी एक थेट आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऐन मे महिन्याचा हप्ता रखडल्याची चर्चा सुरू असतानाच आता प्रशासकीय पातळीवर अत्यंत वेगाने चक्रे फिरली आहेत.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे. १० जून रोजी यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय जारी करून या वितरणाला मंजुरी देण्यात आली.

Ladki Bahin Yojana चा मे महिन्याचा हप्ता कधी येणार?

दुसरीकडे, भाजप आमदार मोनिका राजळे यांनी या हप्त्याबाबत थेट तारखेची घोषणा करून महिलांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात १२ ते १५ तारखेदरम्यान ही रक्कम जमा केली जाईल.

शासकीय मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे पाठवण्याची तांत्रिक प्रक्रिया बँकिंग पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळेच राज्यातील लाखो महिलांचे डोळे आता आपल्या मोबाईलच्या मेसेज इनबॉक्सकडे लागले आहेत.

पण याच दिलासादायक बातमीसोबत एक धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी बंधनकारक केलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे राज्यातील तब्बल ८० लाख महिला या योजनेच्या लाभापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. त्याशिवाय, वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ महिलांचा लाभ नियमानुसार बंद झाला आहे.

दुसरी चिंतेची बाब म्हणजे, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी नोंदणी सध्या पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे पात्र असूनही वंचित राहिलेल्या महिलांना नवीन अर्ज करण्यासाठी सध्या तरी वाट पाहावी लागणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणली होती. या योजनेने विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरत महायुतीला पुन्हा सत्तेत बसवले. महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या जुन्याच हप्त्यांचे आर्थिक गणित जुळवताना प्रशासनाची कसरत होताना दिसत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही