Share

विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत लोकसभेत बिल आणण्याची घोषणा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रेमाने माणसं जिंकण्याचा सल्ला दिला.

Published On: 

Devendra Fadnavis Reply To Supriya Sule मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना

🕒 1 min read

मुंबई – विधान परिषद निवडणुकीत खरोखरच पैशांचा पाऊस पडला का? शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी अचानक माघार का घेतली, यावर सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप केला. एवढेच नाही तर हा प्रकार रोखण्यासाठी लोकसभेत आपण विधेयक आणणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. शनिवारी नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर थेट भाष्य करत सुळेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध देवेंद्र फडणवीस: निवडणुकीतील घोडेबाजारावर आरोप प्रत्यारोप

पैशांच्या बळावर कोणीही निवडून येऊ नये यासाठी आपण लोकसभेत बिल मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे एकदा समजले तर असे बिल मांडण्याची गरजच उरणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झाले पाहिजे याबद्दल कोणाचे दुमत नाही. यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर आपली कोणतीही हरकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले. त्यामुळेच आता या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे कोकण विधान परिषदेतील ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या माघारीवरही फडणवीस यांनी मत मांडले. बाळ माने लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षांचा निर्णय नेहमी अंतिम असतो.

बाळ माने हे आमचेच होते आणि रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीवरुन भाजपकडून त्यांना ‘माघार आघाडी’ म्हणून हिणवले जात आहे.

या टीकेवर सुप्रिया सुळे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये, मी सुसंस्कृत असल्याने काही बोलत नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. अन्य पक्षाच्या उमेदवारांना तपास यंत्रणांची भीती दाखवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने लढू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही