Share

८ व्या वेतन आयोगाची मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात थेट खात्यात जमा होणार वाढीव पगार आणि थकबाकी

८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली असून, एप्रिल २०२७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार आणि थकबाकी जमा होण्याची शक्यता आहे.

Published On: 

8th Pay Commission Update: कधी मिळणार वाढीव पगार?

🕒 1 min read

सरकारी नोकरी म्हटलं की पगारवाढीची उत्सुकता शिगेला पोहोचते, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. केंद्र सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला ८ व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) स्थापना केली, पण तो लागू कधी होणार? या प्रश्नावर आता एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंह पटेल यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, एप्रिल २०२७ मध्ये या नव्या वेतन आयोगांतर्गत वाढलेला पगार, थकबाकी आणि निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

8th Pay Commission Update

केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्ये या आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आता आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. हे गणित पाहता एप्रिल-मे २०२७ च्या आसपास हा आयोग पूर्णपणे लागू होईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या देशभर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी आयोगाच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत बैठक झाल्यानंतर, सध्या हैदराबादमध्ये चर्चा सुरू आहे. यानंतर १ ते ४ जून दरम्यान श्रीनगर आणि ८ जूनला लडाख येथे पुढील बैठका होणार आहेत.

सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे, ७ व्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. त्यामुळे अंतिम घोषणा कधीही झाली तरी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासूनची थकबाकी (Arrears) गृहीत धरून ती एकरकमी खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!