Share

तेजश्री प्रधान आणि राकेश बापट खरंच लग्न करणार आहेत का? तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेत्रीने स्वतः या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Published On: 

Raqesh Tejashree News: तेजश्रीचं लग्नावर मोठं वक्तव्य!

मनोरंजन विश्वात कधी कोणाच्या नात्याच्या चर्चा सुरू होतील सांगता येत नाही, याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. टीव्हीची लाडकी सून तेजश्री प्रधान आणि अभिनेता राकेश बापट यांच्या लग्नाच्या अफवांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

मे महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. आता या सगळ्या प्रकरणावर तेजश्रीने पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे.

Raqesh Tejashree News

अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खोट्या बातम्या पसरवू नका असं रोखठोक आवाहन तेजश्रीने केलं आहे. Raqesh Bapat and Tejashree Pradhan यांच्या लग्नाच्या चर्चा केवळ हवेतील गप्पा असल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

याआधी राकेशची बहीण शीतल हिने या खोट्या बातमीचा भांडाफोड केला होता. माझ्या मैत्रिणी मला तो व्हिडीओ पाठवून विचारत होत्या की ही कोणती नवी सून, पण प्रत्यक्षात त्या दोघांचा काहीही संबंध नाही असं शीतल यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे ज्यावेळी या बातम्या पसरत होत्या, तेव्हा राकेश बिग बॉस मराठीच्या घरात होता.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर स्वतः राकेशलाही या बातमीचा मोठा धक्का बसला. मी घरात असताना बाहेर हे काय नवीन सुरू झालंय हे पाहून मी अवाक् झालो अशी प्रतिक्रिया राकेशने दिली. थोडक्यात सांगायचं तर चाहत्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या या लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा ठरल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही