🕒 1 min read
राजकारणात आणि सिनेसृष्टीत कधी कोणता वाद उफाळून येईल हे सांगता येत नाही. आता थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा (Vijay Trisha) यांच्या कथित नात्यावरून सोशल मीडियावर अशीच एक मोठी खळबळ उडाली आहे.
विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या कुटुंबाऐवजी त्रिशा उपस्थित असल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिनी नावाच्या एका युजरने त्रिशाचा एक भावूक व्हिडीओ शेअर करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
Vijay Thalapathy and Trisha News
या युजरने थेट त्रिशाच्या चारित्र्यावर बोट ठेवत खळबळजनक दावा केला. “त्रिशाने विजयच्या कठीण काळात संघर्ष केला नाही किंवा त्याच्या मुलांना जन्म दिला नाही. आता ती फक्त त्याच्या कुटुंबाची संपत्ती आणि यशाचा आनंद घ्यायला आली आहे,” असा हल्लाबोल या युजरने केला. या धक्कादायक पोस्टमुळे इंटरनेटवर एकच वाद पेटला.
या घृणास्पद ट्रोलिंगवर ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुनिका यांनी सडेतोड उत्तर देत म्हटलं आहे की, “एक महिलाच दुसऱ्या महिलेची सर्वात मोठी शत्रू असते, हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे.” सध्या Vijay Trisha रिलेशनशिपच्या चर्चांनी आधीच राजकीय वर्तुळ तापलं होतं, त्यात आता या नव्या वादाची भर पडली आहे.
एप्रिल २०२६ मध्ये विजय यांच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यापासून दोघांच्या नात्याच्या अफवांनी जोर धरला आहे. निवडणूक निकालानंतर त्रिशाने थेट विजय यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अद्याप या दोघांनीही या कथित अफेअरवर अधिकृत पुष्टी दिलेली नाही. मात्र या नव्या व्हायरल व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!
- मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?
- एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












