Share

मौनी रॉयचा चार वर्षांचा संसार मोडला; इन्स्टाग्रामवर थेट पोस्ट करत केला मोठा खुलासा!

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी ४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोटाची घोषणा केली असून इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

Published On: 

Mouni Roy Divorce: मौनीचा ४ वर्षांचा संसार मोडला!

🕒 1 min read

सिनेसृष्टीत कधी कुणाचं नातं जुळेल आणि कधी कुणाचा संसार मोडेल, याचा काहीच नेम नसतो. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि व्यावसायिक सूरज नांबियार यांच्या चार वर्षांच्या सुखी संसाराला अनपेक्षितपणे पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. अखेर खुद्द या जोडप्यानेच Mouni Roy Divorce News अधिकृत करत या सर्व अफवांवर शिक्कामोर्तब केलंय. या प्रकरणाला सुरुवात झाली ती सोशल मीडियावरून.

Mouni Roy Divorce

मौनी आणि सूरज यांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो करत एकत्र असलेले सर्व फोटो डिलीट केले आणि नेटकऱ्यांनी हे लगेच हेरलं. अखेर मौनीने एक संयुक्त निवेदन जारी करत यावर थेट भाष्य केलं आहे. “आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की, आम्हाला आमचा एकांत आणि मान द्यावा. आमच्या संदर्भात कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नये,” अशी पोस्ट मौनीने केली आहे.

परस्पर संमतीने आपण वेगळे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, नाहक ट्रोलिंग टाळण्यासाठी पोस्टचं कमेंट सेक्शनही बंद ठेवलंय. २०२२ मध्ये अतिशय थाटामाटात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. पण २०२४ पासूनच त्यांच्यात बिनसल्याचं बोललं जात होतं. गेल्या दोन वर्षांत मौनी सूरजसोबत कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसली नव्हती.

यातच भर म्हणून, सूरजने मौनीची फसवणूक केल्याच्या धक्कादायक अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. मात्र, या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. सूत्रांनुसार, सूरजने आता त्याचं इन्स्टाग्राम अकाउंटही डीअॅक्टिव्हेट केलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे चाहत्यांच्या मनात मात्र संशयाची पाल अधिकच चुकचुकली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!