Share

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भारतात खळबळ; सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी, चांदी थेट अडीच लाखांवर!

अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला असून सोन्यानेही १.४८ लाखांचा नवा उच्चांक गाठला आहे.

Published On: 

Gold-Silver Price Prediction: सोने जाणार 3 लाखांच्या पार!

एका रात्रीत काय घडू शकतं, याची प्रचिती आज सकाळी बाजार उघडताच आली. अमेरिकेतील एका निर्णयाने इथलं गणितच बदलून टाकलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ (Tariff) कमी करण्याची घोषणा करताच त्याचे जबरदस्त पडसाद आज भारतीय बाजारात उमटले. शेअर बाजाराने (Share Market) उसळी घेतली खरी, पण सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आली ती सराफा बाजारातून.

आज वायदा बाजार (Commodity Market) उघडताच चांदीच्या भावात (Silver rates) तब्बल २० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. यामुळे एक किलो चांदीचा दर पाहता पाहता २.५ लाख रुपयांच्या पार गेला आहे. सोन्यानेही (Gold Rate Today) मागे न राहता मोठी झेप घेतली आहे. सोन्याचा भाव (Gold rates) प्रतितोळा ४,५०० रुपयांनी वधारून १ लाख ४८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहेत.

Gold Silver Rate Today

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी रात्री भारतावरील आयात कर २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार मानले. मात्र, या ‘मैत्री’च्या अध्यायात एक मोठा विरोधाभास लपलाय का? ट्रम्प यांनी दावा केलाय की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं आणि अमेरिकन वस्तूंवरचा टॅरिफ शून्य करण्याचं मान्य केलंय.

मात्र, पंतप्रधान मोदींच्या ट्विटमध्ये रशिया किंवा तेल खरेदीबाबत चकार शब्दही नाही. मोदींनी फक्त १८% टॅरिफबद्दल आभार मानले आहेत. त्यामुळे या ‘India US Trade Deal’ मध्ये नक्की काय शिजतंय आणि भारताने खरंच रशियाची साथ सोडली का, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही