पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलं? एक्झिट पोलचे आकडे पाहून भाजपमध्ये जल्लोष!

पुणे आणि मुंबई महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून भाजपने मुसंडी मारली आहे. पुण्यात अजित पवारांना धक्का बसणार असून भाजपची एकहाती सत्ता येण्याचा अंदाज आहे.

Published On: 

BJP Minister Chandrakant Patil warns Ajit Pawar | Pune Exit Poll

पुणे – “पुणेकरांच्या मनात नेमकं काय आहे?” हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात प्रत्येकाला पडलाय. पुणे महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अक्षरशः प्रतिष्ठेची केली होती, पण मतदानानंतर समोर आलेल्या आकड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्या १६ जानेवारीला अधिकृत निकाल हाती येतीलच, पण त्याआधीच समोर आलेल्या Pune Exit Poll ने राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे. प्राब (PRAAB) या संस्थेचा अंदाज जर खरा ठरला, तर पुण्यात अजितदादांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.

Pune Exit Poll: दादांना धक्का, पुण्यात कमळच फुलणार? आकडेवारी काय सांगते?

प्राबच्या सर्व्हेनुसार, पुणे महापालिकेच्या १६२ जागांपैकी भाजप एकहाती सत्ता मिळवताना दिसत आहे. भाजपकडे तब्बल ९१ जागा जाण्याचा अंदाज असून, हे स्पष्ट बहुमत आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ४३ जागांवर समाधान मानावं लागेल, असं हे आकडे सांगतायत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था तर अजूनच बिकट असून, त्यांना दोन अंकी संख्या गाठतानाही नाकीनऊ येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्राबचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता, त्यामुळेच या Exit Poll मुळे विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आहे.

केवळ पुणेच नाही, तर मुंबईतही Axis My India आणि ‘जनमत’च्या सर्व्हेनुसार भाजप आणि महायुतीचाच डंका वाजत आहे. मुंबईत भाजपला १३० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकीकडे मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागत असताना, दुसरीकडे पुण्यातही ‘कमळ’ फुलणार असल्याचं चित्र आहे. अर्थात, हे फक्त एक्झिट पोलचे अंदाज आहेत. उद्या सकाळी १० वाजता ईव्हीएम उघडल्यावर नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण तुर्तास तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे, एवढं नक्की!

पुणे महापालिका अंदाज

भाजप – 91

राष्ट्रवादी – 43

शिवसेना- 7

काँग्रेस – 8

 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही