Share

“लढण्याआधीच रडल्या आणि पळाल्या…”; पूजा मोरेंच्या माघारीवर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

OBC leader Laxman Hake slams Pooja More for withdrawing from the election, calling it just a “trailer” and warning Maratha leaders of consequences.

Published On: 

OBC leader Laxman Hake slams Pooja More for withdrawing from the election, calling it just a "trailer" and warning Maratha leaders of consequences.

🕒 1 min read

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवूनही सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे माघार घ्याव्या लागलेल्या पूजा मोरे (Pooja More) यांच्यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “तुम्ही लढण्याआधीच रडल्या आणि रणांगणातून पळाल्या,” असा टोला हाकेंनी लगावला आहे. इतकेच नाही तर, “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है,” म्हणत त्यांनी मराठा आरक्षणातील बड्या नेत्यांनाही थेट इशारा दिला आहे.

पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी अर्ज मागे घेताना व्यक्त केलेल्या भावनांवरून हाकेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “तुमचं ‘लगा लगा आणि मला बघा’ असं झालंय. काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्ष… सगळे पक्ष फिरून झाले आणि आता कमळावर निवडणूक लढायला आलात? पण जनतेला सगळं कळतं. तुमचा पती छगन भुजबळांच्या गाडीवर दगडं मारायला निघाला होता, आणि आज तुम्ही रडत आहात? हा नियतीचा खेळ आहे.”

लक्ष्मण हाके यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनाही लक्ष्य केले. “अती केली की माती होते, हे आता सिद्ध होत आहे. पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर आहे. खासदार बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि राजेश टोपे यांचा पिक्चर अजून बाकी आहे. तुम्ही ओबीसी नेत्यांना आणि समाजाला सोडलं नाही, आता त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा आक्रमक पवित्रा हाकेंनी घेतला.

जुन्या व्हिडिओवरून आणि देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे पूजा मोरे यांना भाजप कार्यकर्त्यांकडूनच प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी डोळ्यात पाणी आणत उमेदवारी मागे घेतली. मात्र, त्यांच्या या माघारीवरून आता ओबीसी विरुद्ध मराठा असा कलगीतुरा पुन्हा रंगला आहे.

सरीकडे, नाशिक दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी पूजा मोरेंच्या समर्थनार्थ ट्रोलर्सचा समाचार घेतला. ते म्हणाले, “निवडणुकीच्या काळात जुने व्हिडिओ उकरून काढून कोणाला टार्गेट करणे चुकीचे आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही.” जरांगे पुढे म्हणाले की, “जर असे प्रकार थांबले नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील. अन्यायाविरुद्ध आम्ही नेहमीच उभे राहू.”

एकीकडे हाकेंनी पूजा मोरेंच्या माघारीला ‘पाप’ म्हटले आहे, तर जरांगे पाटलांनी याला ‘ट्रोलिंगचा अतिरेक’ म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे. त्यामुळे पूजा मोरे प्रकरणावरून आता हाके विरुद्ध जरांगे असा नवा कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही