मनोज जरांगेंचा ट्रोलर्सना सज्जड दम; पूजा मोरेंच्या समर्थनार्थ घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले “परिणाम भोगावे लागतील!”

Manoj Jarange Patil warns trolls targeting BJP candidate Puja More with old videos during Nashik elections.

Published On: 

Manoj Jarange Patil warns trolls targeting BJP candidate Puja More with old videos during Nashik elections.

नाशिक: महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच आता सोशल वॉर देखील पेटले आहे. मात्र, या राजकीय लढाईत पातळी घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार पूजा मोरे (Puja More) यांच्या जुन्या व्हिडिओवरून सध्या सोशल मीडियावर घाणेरडे राजकारण सुरू असून, या प्रकारावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी विरोधकांना आणि ट्रोलर्सना थेट शब्दांत “दुष्परिणाम भोगावे लागतील” असा इशारा दिला आहे.

निवडणुकीच्या काळात मुद्द्यांवर लढण्याऐवजी उमेदवारांची जुनी मढी उकरून काढण्याच्या प्रकारावर जरांगे पाटलांनी कडाडून टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “निवडणुकीच्या काळात जुने व्हिडिओ उकरून काढून कोणाला टार्गेट करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात विचारधारेची लढाई असावी, पण एखाद्याची बदनामी करण्यासाठी खालच्या पातळीवर जाणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.”

Manoj Jarange Warns Trolls

पूजा मोरे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुरू असलेल्या ट्रोलिंगचा समाचार घेताना जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले. “जर असे प्रकार थांबले नाहीत, तर त्याचे गंभीर दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आमचा धर्म आहे आणि आम्ही अशा घाणेरड्या राजकारणाला खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एरवी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करणाऱ्या जरांगे पाटलांनी भाजप उमेदवारावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेला विरोध करत, महिला सन्मानाचा मुद्दा अधोरेखित केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ट्रोलर्सला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही