Share

अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याची हत्या; भरदिवसा गाडीने उडवून धारदार शस्त्राने वार, हल्लेखोर फरार

Amravati ASI brutally murdered: hit by car, then stabbed; attackers abscond.

Published On: 

Amravati ASI brutally murdered: hit by car, then stabbed; attackers abscond.

🕒 1 min read

अमरावती: शहरात एका धक्कादायक घटनेत सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने अमरावती शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमरावती पोलिस आयुक्तालयाअंतर्गत वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय कलाम आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर कलाम खाली पडताच, पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

Amravati Police Officer Abdul Kalam Murdered

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.

पोलीस अधिकाऱ्याची अशा क्रूरपणे हत्या झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “जेव्हा पोलिसच सुरक्षित नाहीत, तेव्हा नागरिक सुरक्षित कसे राहणार?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमरावती शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही