🕒 1 min read
पुणे: बँकेचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि बँकेत गेल्यावर कळतं की आज सुट्टी आहे, असा अनुभव अनेकांना आला असेल. तुमचा असा हिरमोड होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेली जुलै २०२५ मधील बँक सुट्ट्यांची यादी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या येत्या जुलै महिन्यात देशभरातील बँका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या विविध राज्यांमधील सण, धार्मिक कार्यक्रम आणि साप्ताहिक सुट्ट्यांवर आधारित आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यात सुट्ट्यांची संख्या वेगवेगळी असू शकते.
July 2025 Bank Holidays
जुलै २०२५ महिन्यात एकूण ६ दिवस साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका बंद राहतील. यात चार रविवार आणि दोन शनिवारचा समावेश आहे.
६ जुलै २०२५: पहिला रविवार
१३ जुलै २०२५: दुसरा रविवार
२० जुलै २०२५: तिसरा रविवार
२७ जुलै २०२५: चौथा रविवार
१२ जुलै २०२५: दुसरा शनिवार
२६ जुलै २०२५: चौथा शनिवार
साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त, जुलै महिन्यात विविध राज्यांमधील स्थानिक सण आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे आणखी ७ दिवस बँका बंद राहतील. या सुट्ट्या विशिष्ट राज्यांसाठीच लागू असतील:
३ जुलै २०२५: खारची पूजा (आगरतळा)
५ जुलै २०२५: गुरु हरगोबिंद सिंहजी जयंती (जम्मू आणि श्रीनगर)
१४ जुलै २०२५: बकरी ईद (ईद-उल-अजहा) (शिलाँग)
१६ जुलै २०२५: हरेला सण (देहरादून)
१७ जुलै २०२५: यू तिरोट सिंग पुण्यतिथी (शिलाँग)
१९ जुलै २०२५: केर पूजा (आगरतळा)
२८ जुलै २०२५: द्रुकपा त्से-शे सण (गंगटोक)
बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील आणि तारखेनुसार बँकेला सुट्टी ( Bank holidays ) आहे की नाही, हे एकदा तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कामाचा खोळंबा होणार नाही. आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून किंवा आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अद्ययावत माहिती मिळवू शकता.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘प्रश्न न विचारता बॉम्ब हल्ला करेन’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा कडक इशारा
- राज-उद्धव एकत्र येणार का? आशा भोसले म्हणाल्या, मला फक्त आशिष शेलार माहिती!
- “रडत होते, पाया पडले… तरी त्याने बलात्कार केला!” लॉ कॉलेजमध्ये संतापजनक घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












