🕒 1 min read
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ( Vaishnavi Suicide Case ) आज न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी हगवणे कुटुंबातील पाचही सदस्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने शशांक, लता आणि करिश्माला एक दिवसाची तर राजेंद्र आणि सुशील हगवणेला 31 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, यावेळी हगवणेंचे वकील विपुल दुषिंग यांनी केलेले दावे खळबळजनक ठरले.
हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर, आता हगवणेंचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दुषिंग यांनी सांगितले की, “आम्ही वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन केले नाही, फक्त सत्य कोर्टात मांडलं. वैष्णवीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं. त्या व्यक्तीचे दुसऱ्या मुलीशी १९ मे रोजी साखरपुडा झाला आहे. आम्ही त्या व्यक्तीचं नाव, डिटेल्स, साखरपुड्याची तारीख आणि चॅटिंगही न्यायालयात दिलं आहे. आम्ही ते चॅट व्हिडिओ व्हायरल केले असते, पण वैष्णवी आमच्या घरची सून होती, त्यामुळे आम्ही ती गोष्ट केवळ तिच्या माहेरी सांगितली.”
Vaishnavi Suicide Case Pune
वकिलांनी असा दावाही केला की, “वैष्णवीने आधी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती, तिने याआधी रॅट पॉइझन आणि गाडीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही वकिलांनी सांगितले. वैष्णवी आणि तिचा नवरा या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल या कारणामुळेच भांडणं झाले आहेत. तिच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह गोष्टीमुळेच ही भांडणं झाली आहेत.” या सर्व बाबींची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे, असं हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्टपणे नमूद केलं.
“राजेंद्र हगवणे यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. ते 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी का छळ करतील?” त्यामुळे पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी विपुल दुषिंग यांनी केली होती, कोर्टाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या!- वकिलांचा कोर्टात थरारक युक्तिवाद
- वैष्णवीचे ‘ते’ चॅट आमच्याकडे, चार कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही! कोर्टात धक्कादायक युक्तिवाद
- “मविआ खड्ड्यात गेली!” उद्धव ठाकरे गटाचे बंड; राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा!












