Share

कोहलीच्या सन्मानार्थ पांढऱ्या टीशर्टमुळे सामना अडचणीत? चेंडू दिसणार नाही!

Aakash Chopra raised safety concerns over fans wearing white T-shirts to honor Virat Kohli, suggesting RCB jerseys instead for better ball visibility.

Published On: 

Aakash Chopra raised safety concerns over fans wearing white T-shirts to honor Virat Kohli, suggesting RCB jerseys instead for better ball visibility.

क्रीडा प्रतिनिधी | विराट कोहलीने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या सन्मानार्थ RCB चाहत्यांनी पुढाकार घेत, RCB विरुद्ध KKR आयपीएल सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संकल्पनेवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे.

चोप्रा म्हणाले, “पांढरे कपडे घातल्यास, सफेद चेंडू प्रेक्षकांच्या टी-शर्टमध्ये मिसळू शकतो, ज्यामुळे फील्डर्सना फिल्डिंग करताना अडचण होऊ शकते. अशावेळी अपघाताची शक्यता वाढते.” त्यांनी चाहत्यांना पांढऱ्या टीशर्टऐवजी विराटचा ‘RCB क्र. 18’ जर्सी घालण्याचा सल्ला दिला. “तिरंगा मनात ठेवा आणि अंगावर RCB जर्सी घाला, मैदानावरील दृश्यतेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या,” असं चोप्रा यांनी स्पष्ट केलं.

Aakash Chopra advised RCB Virat Kohli fans

त्याचबरोबर, RCBच्या संघरचनेबाबतही चोप्रा यांनी मत व्यक्त केलं. देवदत्त पडिक्कलच्या जागी मयांक अग्रवालला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, खालच्या फळीत मनोज भांडगेला संधी देऊन राजत पाटीदारला वरती खेळवावं, असं सुचवलं.

गोलंदाजीबाबत बोलताना चोप्रा म्हणाले, “लुंगी एन्गिडी प्लेऑफसाठी उपलब्ध नसेल, त्यामुळे नुवान तुशाराला आताच खेळवून तयार करा. जोश हॅझलवूडच्या अनुपस्थितीत तो पर्याय ठरू शकतो. प्लेऑफसाठी जो अंतिम संघ असणार आहे, तोच संघ आताच खेळवा, जेणेकरून अचानक बदलाची गरज पडणार नाही,” असंही चोप्रा यांनी नमूद केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही