Share

‘त्या’ भेटीवर Suresh Dhas यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “संतोष देशमुख प्रकरणात कॉम्प्रोमाईज…”

Suresh Dhas has explained about the meeting with Dhananjay Munde. This has put an end to various discussions in political circles.

by MHD

Published On: 

Suresh Dhas first reaction on meeting with Dhananjay Munde

Suresh Dhas । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आमदार सुरेश धस यांची गुप्तभेट झाल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. इतकेच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीच ही भेट घडवून आणल्याचा आरोप मस्साजोग येथील नागरिकांनी केला आहे.

यावर आता सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “चंद्रशेखर बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मला जेवायला बोलावले होते. त्यांनी बोलावल्यावर तिथे जाणे माझे काम आहे. कारण ते माझे बॉस आहेत. मी तिथे गेल्यावर काही वेळाने तिथे धनंजय मुंडे आले आणि आमच्यात अर्धा-पाऊण तास चर्चा झाली,” अशी माहिती धस यांनी दिली.

“विकासाच्या बाबतीत तुम्ही भांडू नका, असे बावनकुळे यांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत मी नो कॉम्प्रोमाईज अशी भूमिका घेतली. यावर बावनकुळेंनी सहमती दाखवली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो,” असे धस यांनी भेटीवरून स्पष्टीकरण दिले आहे.

Suresh Dhas on meeting with Dhananjay Munde

“दोन तीन दिवसांपूर्वी मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटायला गेलो होतो. मी लपून गेलो नव्हतो. त्यावेळी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मी कॉम्प्रोमाईज करणार नाही, असे सांगितले. जर तुमची तब्येत ठीक नसेल तर पुन्हा एकदा रुग्णालयात जा, असा सल्ला मी दिला,” असेही धस यांनी सांगितले.

दरम्यान, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातही आपण कॉम्प्रोमाईज करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

Leave a Comment

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही