Share

Santosh Deshmukh यांच्या पत्नीला मिळाली नोकरी, ‘या’ पदावर झाली नियुक्ती

After Santosh Deshmukh murder, there was a constant demand that his wife Ashwini Deshmukh should be given a government job.

by MHD

Published On: 

Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh appoint to school clerk

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या (Santosh Deshmukh murder) करण्यात आली. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही.

पोलिसांनी या प्रकरणी आठ आरोपींना अटक केली असून आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही फरार आहे. पोलिसांची पथके संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. तरीही तो पोलिसांच्या हाती लागत नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांना सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अशातच आता त्यांना केजमधील आडस या गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नोकरी देण्यात आली आहे.

ही शिक्षण संस्था रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांची असून अश्विनी देशमुख यांना कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी देण्यात आली आहे. रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन नियुक्तीचे पत्र दिले आहे.

Santosh Deshmukh wife Ashwini Deshmukh appoint to clerk

परंतु, सरकारी नोकरीची मागणी होत असताना अश्विनी देशमुख यांना श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात नोकरी मिळाली आहे. त्यामुळे आता अश्विनी देशमुख या ही नोकरी स्विकारायची की नाही? याबाबत देशमुख कुटुंब बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही