संतोष देशमुख हत्याप्रकरणावर Udayanraje Bhosale यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; “काहीही झाले तरी दोषींवर…”

Udayanraje Bhosale । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. राज्यभरातून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. असे असताना भगवानगडाचे महंत नामदेव … Read more

by MHD

Published On: 

Udayanraje Bhosale statement on Santosh Deshmukh Murder Case

Udayanraje Bhosale । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. राज्यभरातून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

असे असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी त्यांना पाठिंबा देत आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा केला. यामुळेही नामेदव शास्त्री यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर आता याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“या प्रकरणात कोणाची गय केली जाणार नसून कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कारवाई होणारच आहे. आपल्या देशात लोकशाही असून येथे न्यायालयासमोर सर्वच समान आहेत. काहीही झाले तरी यातील दोषींवर कारवाई होणार आहे,” असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Udayanraje Bhosale on Santosh Deshmukh murder case

दरम्यान, याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. पण मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले असताना विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही