Share

मोठी बातमी! Krishna andhale चा तपास लागला? समोर आली महत्त्वाची बातमी

Krishna Andhale has not been caught yet. Similarly, now a big claim has been made about Krishna Andhale.

by MHD

Published On: 

Where is Krishna andhale, Information given by suresh dhas

🕒 1 min read

Krishna andhale । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. परंतु, यातील नववा आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे.

कृष्णा आंधळे याला पकडण्यात अजूनही यश आले नाही. अशातच आता कृष्णा आंधळे याच्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कृष्णा आंधळेच्या पत्त्याबाबत मोठा खुलासा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

“कृष्णा आंधळे हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असून आता तो नेपाळमध्ये गेला असेल. बीड जिल्ह्याची बदनामी चाटायची का? एकीकडे महादेव मुंडेचे मारेकरी सापडत नाही. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणी आता एलसीबी तपास करणार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Suresh Dhas on Krishna andhale

दरम्यान, यापूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची अफवा झाली होती तर तो कधी प्रयागराज आणि मध्यप्रदेशामध्ये असल्याची चर्चा झाली. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं संपूर्ण राज्यात मागावर असली तरी तो अजूनही पोलिसांना सापडला नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही