Share

आरक्षणासाठी Manoj Jarange यांचे पुन्हा आमरण उपोषण, यावेळी मागण्या काय?

Maratha community leader Manoj Jarange Patil has once again started a hunger strike for the reservation of Maratha community.

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil Strike for Maratha Reservation in Antarwali Sarati

Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रासह इतर मागण्यांसाठी जरांगे मैदानात उतरले आहेत. (Manoj Jarange Patil Strike for Maratha Reservation)

जाणून घेऊयात त्यांच्या मागण्या :

  • मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच असून या समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे.
  • हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
  • न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करून या समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी.
  • सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
  • महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या सर्वांच्या केसेस सरसकट मागे घेऊन गुन्हे रद्द करावे.
  • 10 टक्के एसईबीसी आरक्षण लागू करावे.
  • कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आले होते ते कक्ष पुन्हा सुरु करावे. वंशावळ समिती, मोडी लिपी समिती व सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करावी.

Manoj Jarange Patil Strike

  • महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी असून ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे आणि 2004 सालचा अध्यादेश आहे. मराठ्यांची पोटजात-उपजात कुणबी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही