Share

Guillain Barre Syndrome । सावधान! राज्यात पुन्हा दुर्मिळ आजाराचं थैमान, तुम्हालाही आहेत का ‘ही’ धोकादायक लक्षणे?

Guillain Barre Syndrome is a disease that weakens the immune system and affects even newborns.

by MHD

Published On: 

Guillain Barre Syndrome In state, Know the symptoms

Guillain Barre Syndrome । कोरोनानंतर राज्यात आता पुन्हा एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग (Department of Health) देखील अलर्ट झाला असून केंद्राचं पथक राज्यात दाखल झाले आहे.

या आजाराचं नाव गुलेन बॅरी सिंड्रोम असे आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतो. या आजाराचा फटका नवजात बालकांना देखील बसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या आजारावर उपचार करता येत आहेत.

Guillain Barre Syndrome Symptoms

गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे

हे लक्षात घ्या की गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे अचानक दिसतात. विशेष म्हणजे ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवडाभरात झपाट्याने वाढतात. सामान्य लक्षणांमध्ये अंग दुखणे, चालताना तोल जाणे, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, चेहरा सुजणे, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे यांसारखी लक्षणे या आजारात दिसतात.

उपचार

उपचारामध्ये इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज यांसारख्या इम्युनोथेरपीचा समावेश असून मज्जातंतूंचे नुकसान कमी करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आधार घेण्यात येतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही