Suzuki E-Access : सुझुकी मोटरसायकल इंडियाने ऑटो एक्स्पो 2025 (Auto Expo 2025) मध्ये त्यांची अॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर (Suzuki E-Access) सादर केली असून त्याची डिजाइन खूपच स्टायलिश आणि स्मार्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. सुझुकीची ही अॅक्सेस पेट्रोल अॅक्सेसपेक्षा थोडी वेगळी दिसणार आहे. ही स्कूटर थेट टीव्हीएस आयक्यूब, एथर, बजाज चेतक आणि ओला इलेक्ट्रिकला टक्कर देईल. तसेच कंपनीने सुझुकी अॅक्सेसचे फेसलिफ्ट मॉडेलही बाजारात आणले आहे.
Suzuki E-Access फीचर्स
सुझुकी ई-अॅक्सेस स्कूटर तीन ड्युअल-टोन रंगसंगतींमध्ये उपलब्ध असून ते मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर 2/मेटॅलिक मॅट बोर्डो रेड, पर्ल ग्रेस व्हाइट/मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल जेड ग्रीन/मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे आहेत. स्कूटरची डिजाइन स्मार्ट आहे जी तरुणांना आवडेल. स्कूटरमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे ज्यामध्ये ओडोमीटर, रेंज, बॅटरी, ट्रिपमीटर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच कनेक्टिव्हिटीमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ट्रॅफिक अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे.
ई-अॅक्सेसमध्ये इको, राईड ए आणि राईड बी असे तीन राईड मोड्स आहेत. त्यात एक फॉब आहे, ज्याद्वारे स्कूटरला दूरवरून लॉक/अनलॉक करता येते. खराब रस्त्यांसाठी, त्यात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील्स आहेत. त्याची सीट उंची 765 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 165 मिमी आणि कर्ब वजन 122 किलो इतके आहे. यामध्ये 4.1 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 15 एनएमचा पीक टॉर्क मिळतो. तसेच यात 3.07 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देखील आहे, जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 95 किमी पर्यंतची रेंज देतो. त्याचा टॉप स्पीड 71 किमी प्रतितास असून पोर्टेबल चार्जर वापरून ई-अॅक्सेस 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 6 तास 42 मिनिटे लागतात. फास्ट चार्जरच्या मदतीने ते फक्त 2 तास 12 मिनिटांत चार्ज होते.
Suzuki E-Access किंमत
सुझुकी ई-अॅक्सेस 2025 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे १.२० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
- 5.99 लाखांची 7 सीटर कारवर मिळत आहे 55 हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर
- श्रीकांत शिंदे पुन्हा चर्चेत, वाहतुकीचा नियम केला ब्रेक, कारवाई होणार का?
- Google Search Engine ला मोठा धक्का, चक्क बाजारातील हिस्सा 90% पेक्षा कमी झाला, ‘हे’ आहे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












