5.99 लाखांची 7 सीटर कारवर मिळत आहे 55 हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर

Renault Triber Offer: The demand for 7-seater cars has been increasing rapidly in the Indian market for the last few days.

Published On: 

Renault Triber Offer Get a discount of Rs 55000 check all details

Renault Triber  Offer :  भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून 7 सीटर कारची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे . त्यामुळे एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्ससह येणाऱ्या 7 सीटर कार आता भारतीय बाजारात उपलब्ध झाल्या आहे. यातच जर तुम्ही देखील 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

या बातमीनुसार बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या ट्रायबर 7 सीटर कारवर तब्बल 55 हजारांची सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 30,000 रुपयांची रोख सूट, 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त 2024 च्या मॉडेलवर उपलब्ध आहे. भारतीय बाजारात ट्रायबरची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault Triber इंजिन आणि पॉवर

कंपनीने या शानदार कारमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ते 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा -स्पीड एएमटीशी जोडलेले आहे. ते मॅन्युअलमध्ये प्रति लिटर 17.65 किमी आणि ऑटोमॅटिकमध्ये प्रति लिटर 14.83 किमी मायलेज देते.

Renault Triber Features

रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 5+2 सीटिंग पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट करता येते.  मात्र या कारमध्ये बूट स्पेस दिलेली नाही. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD ची सुविधा देखील आहे.

महत्वाच्या बातम्या :

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही