Share

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

Ajit Pawar group and BJP MLA Suresh Dhas have come face to face. Amol Mitkari, leader of Ajit Pawar group, had made serious allegations against Suresh Dhas. It has now been answered by Suresh Dhas.

by MHD

Published On: 

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

Suresh Dhas । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरुन आता राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपचे आमदार सुरेश धस (NCP vs Suresh Dhas) आमनेसामने आले आहेत. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आता सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल. अमोल मिटकरी, सुरज चव्हाण हे पहिली दुसरीतील मुले आहेत, अशीही जहरी टीका सुरेश धस यांनी केली आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा, तू इथे ये. कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना कशाला बोलायला लावतेस. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. त्यामुळे आता त्या मुन्नीने पुढे यावं. मुन्नी पुढे आल्यावर मी सुन्नी करतो, असे आव्हान सुरेश धस यांनी दिले आहे.

Suresh Dhas on NCP

सुरेश धस यांच्या आवाहनामुळे आता राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुन्नी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. धसांच्या या आरोपावर राष्ट्रवादी विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यावर काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही