Share

नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला जनता उत्सुक – अमोल मिटकरी

Nitesh Rane सारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक” असल्याचे Amol Mitkari म्हणाले.

Published On: 

Mahayuti Amol Mitkari VS Nitesh Rane NCP

Amol Mitkari ।  अकोला : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन  महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळत आहे.  सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो ट्विट करत महायुती सरकारला धारेवर धरले होते. त्यावरुन, नितेश राणेंनी अमोल मिटकरी यांचं हिंदुत्त्व तपासण्याची वेळ आलीय, तसेच, मिटकरींना हिंदू धर्मातून हाकलण्याची वेळ आलीय असे राणेंनी म्हटलं होतं.

यावरून राणे- मिटकरी यांच्यात जुंपली आहे. अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नेपाळला पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटलंय.

अमोल मिटकरी म्हणतात, ”नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये. तसेच, मालवणच्या पुतळा प्रकरणावर चकार शब्द न बोलणारे नितेश राणे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच असे वक्तव्य करीत आहेत. राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहेत, याचं उत्तर दिलं तर त्यांना आपण खरं हिंदू समजू. तसेच, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक” असल्याचे Amol Mitkari म्हणाले.

Mahayuti | Amol Mitkari VS Nitesh Rane 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही