🕒 1 min read
Karuna Munde VS Rupali Chakankar And Chitra Wagh
मुंबई । Badlapur Case । बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. करुणा धनंजय मुंडे ( Karuna Dhananjay Munde ) यांनीही या घटनेवर निषेध व्यक्त करत रुपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
रुपाली चाकणकर, चित्रा वाघ या महिला बदलापूर अत्याचार प्रकरणावर राजकारण करतात. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, पण त्यांनी किती महिलांना न्याय दिला? फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत फिरतात. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार आहे का? असा सवाल करत करुणा धनंजय मुंडेंनी वाघ-चाकणकरांना धारेवर धरले.
रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्या विरोधात दिल्लीमध्ये निवेदन दिले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. चाकणकर यांना पदावरून बडतर्फ करावे आणि दुसऱ्या कोणाची नियुक्ती करावी, असे निवेदन दिल्लीत दिल्याचे मुंडे सांगतात.
पूजा चव्हाण अत्याचार प्रकरणात मंत्री संजय राठोडच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. चित्रा वाघ यांनी राठोड विरुद्ध केस दाखल केली होती. पण ५ ते ६ दिवसापूर्वी केस मागे घेण्यासाठी कोर्टात निवेदन दिले असल्याचे करुणा धनंजय मुंडेंनी सांगितले. या महिला राजकारणी फक्त राजकारण करतात.
संजय राठोड आज तुमच्या पक्षात आहे, म्हणून तुम्ही केस मागे घेता. मी एक विचारते,” जर या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही अशीच माघार घेतली असती का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्ही महिला आहे कि नाही? महिला सोडा, तुम्ही माणूस पण आहात कि नाही? असा सवालही मुंडेंनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. आज राजकारण खूप खालच्या पातळीला गेले आहे. बलात्काऱ्यांना बसवून हे लोक राजकारण करत असल्याचे मुंडेंनी सांगितले.
पुढे बोलतांना मुंडे म्हणाल्या की,” ज्या वेळी अत्याचार होतो, त्यावेळी खूप मानसिक त्रास देतात हे लोक. शिवाय पोलीस प्रशासन या लोकांना मदत करते. ज्यावेळी माझे भांडण झाले, तेव्हा मला दोन वेळा जेल मध्ये टाकले. ५० कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही मी मागे हटले नाही. मला जेलमध्ये टाकले, माझ्या मुलांना उचलून घेऊन गेले. असे सगळे अत्याचार मी स्वतः बघितले आहेत.
Karuna Dhananjay Munde कोण आहेत? मंत्री धनंजय मुंडेंशी काय संबंध?
करुणा शर्मा ( मुंडें ) मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. करुणा शर्मा ( मुंडें ) यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. आपणच धनंजय मुंडेंची पत्नी आहोत, असे त्या सांगतात. करुणा यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांचं नाव ‘करुणा धनंजय मुंडे’ असं लिहिले आहे.
करुणा शर्मा यांच्यासोबत 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत, अशी जाहीर कबुली मंत्री धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारी 2021 रोजी दिली आहे. सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. ठाकरेंच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभाग मंत्री पदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करूणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- बदलापूर प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावले; FIR दाखल करण्याची दिली धमकी
- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव
- ‘माझ्या मुलाला सोडा, मला कोणी नाहीये…’, गृहमंत्री फडणवीसांविरोधात आईचा आक्रोश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












