दोन हजारांच्या ८,२०२ कोटी मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

2000 Note मुंबई: रिझर्व्ह बँकेने वितरणातून काढून टाकलेल्या २,००० रुपयांच्या सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा … Read more

Published On: 

2000 Note मुंबई: रिझर्व्ह बँकेने वितरणातून काढून टाकलेल्या २,००० रुपयांच्या सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली गेली होती. नंतर ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकेने नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा ज्या दिवशी केली त्या १९ मे २०२३ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते.

तर २९ मार्च २०२४ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी अद्याप लोकांहाती असलेल्या या नोटांचे मूल्य ८,२०२ कोटी रुपयांवर घसरल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही