Share

Rohit Sharma | डाव्या हाताच्या गोलंदाजांविरुद्ध रोहित शर्मा कमकुवत? संजय मांजरेकर म्हणतात

SA vs IND: Rohit Sharma’s weakness against left-hand bowlers is a thing of past, says Sanjay Manjrekar | रोहित शर्मा मराठी बातम्या | Rohit Sharma, Latest News | SA vs IND Test Series Squads | India Vs South Africa Test Series Live Streaming Details  | India Vs South Africa: Test Series Schedule

Published On: 

🕒 1 min read

Rohit Sharma | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा डाव्या हाताच्या गोलंदाजांविरुद्ध कमकुवत असल्याची टीका होत असते. रोहितला डाव्या हाताच्या गोलंदाजांचा सामना करताना कठीण जाते तसेच त्याची धावसंख्या हि कमी होते.

यावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, ”रोहित शर्माचा डावखुरा वेगवान गोलंदाजांसोबतचा संघर्ष आता संपला आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजांविरुद्ध रोहित कमकुवत पडतो ही भूतकाळातील गोष्ट आहे.

विश्वचषकात डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि शाहीन आफ्रिदी सारख्या गोलंदाजांचा रोहितने सहज सामना केला आणि संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.” असे मांजरेकर म्हणाले.

पुढे बोलतांना मांजरेकर म्हणाले,  “तुम्ही ज्या कमकुवतपणाबद्दल बोलत आहात, डाव्या हातांविरुद्धची कमजोरी ही भूतकाळातील गोष्ट आहे. आता नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत त्याला कोणतीही अडचण आली नाही. मला वाटते तो एक चांगला कसोटीपटू बनला आहे,” मांजरेकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हि प्रतिक्रिया दिली.

रोहित शर्माची फलंदाजी करण्याच्या त्याच्या दृष्टीकोनात लक्षणीय बदल झाले आहेत. रोहितचे ( Rohit Sharma ) क्रीजवर कब्जा करणे आणि एक इनिंग तयार करणे यावर लक्ष केंद्रित करतो. जसे की इंग्लंडमधील मालिकेदरम्यान तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला.

रोहित शर्मा कसोटी सलामीवीर म्हणून समोर आला तेव्हा त्याने इंग्लंड विरुद्ध शतक केले आणि त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2-कसोटींच्या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

SA vs IND Test Series Squads

भारताचा कसोटी संघ :  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ : टेम्बा बावुमा (C), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन

India Vs South Africa: Test Series Schedule

पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबरला सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7  जानेवारीत केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

India Vs South Africa Test Series Live Streaming Details 

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे भारतात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर IND Vs SA Test Series सामन्यांचे  Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!