🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन सुरू आहे. कुणबी दाखल्याच्या पुराव्याच्या आधारे राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.
अशात याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडले आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात जुने रेकॉर्ड तपासत असताना कुणबी दाखल्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.
सरसकट मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. अशात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यात कुणबी दाखल्यांची नोंद असल्याचं समोर आलं आहे.
तर सोलापूरमधील काही राजकारण्यांनी आधीच कुणबी असल्याचे दाखले काढून घेतल्याचंही यामध्ये समोर आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात 25 पेक्षा अधिक दाखले सापडले आहे. यानंतर मराठा आंदोलक अजून संतप्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.
A delegation of the state government will visit Manoj Jarange over Maratha reservation
दरम्यान, मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.
आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी बोलवल्यानंतर देखील कोणताही राजकीय नेता त्यांच्या भेटीला जाणार नाहीये. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहे.
या भेटीदरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाजू समजून सांगणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? शिंदे-फडणवीसांचं शिष्टमंडळ जाणार भेटीला
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात वाढणार थंडीचा जोर, पाहा हवामान अंदाज
- Maratha Reservation | देवेंद्र फडणीसांनी चिल्लर चाळे बंद करावे; आम्ही मागे हटणार नाही – मनोज जरांगे
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांना आता तरी जाग येणार? मराठा आरक्षणासाठी एका दिव्यांग तरुणाची आत्महत्या
- Manoj Jarange | शिंदे-फडणवीसांनी इंटरनेट बंद करून राज्यातील वातावरण दूषित करू नये; मनोज जरांगे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











