Share

Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? शिंदे-फडणवीसांचं शिष्टमंडळ जाणार भेटीला

🕒 1 min readMaratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस भडकत चाललं आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने स्पष्ट केली आहे. तर दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी काल (01 नोव्हेंबर) रात्रीपासून पाणी पिणं बंद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काल दुपारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदीसह इंटरनेट … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस भडकत चाललं आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने स्पष्ट केली आहे.

तर दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी काल (01 नोव्हेंबर) रात्रीपासून पाणी पिणं बंद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काल दुपारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे या भागातील अपडेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाहीये. अशात मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

An all-party meeting was held to find a solution to the Maratha reservation issue

काल मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण थांबवावं, असं आवाहन या बैठकीनंतर करण्यात आलं.

परंतु, मनोज जरांगे मागे हटले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावं, मराठा समाज त्यांना संरक्षण प्रदान करेल, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

मात्र, जरांगेंच्या भेटीला कोणताही राजकीय नेता जाणार नाही. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला जाणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घ्यायला जाणार आहे.

यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांचा समावेश आहे.

राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) कायदेशीर बाजू समजून सांगणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्यास देखील ते सांगणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!