🕒 1 min read
Manoj Jarange | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत आक्रमक झालेला असून त्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात बहुतांश ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. इंटरनेट सेवा बंद करून शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील वातावरण दूषित करू नये, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
मनोज जरांगे म्हणाले, “मी आणि माझा मराठा समाज आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही.
राज्य सरकारने इंटरनेट सेवा बंद केली असली तरी आम्ही मागे सरकणार नाही. कारण तुमच्या इंटरनेटपेक्षा आमचा मराठा समाज मोठा झाला आहे.
उपोषण स्थळी महाराष्ट्रातून काल रात्री हजारो लोक दाखल झाले आहे. त्यांनी रात्रभर या ठिकाणी खडा पहारा दिला आहे. त्यामुळे माझं राज्य सरकारला सांगणं आहे की त्यांनी राज्यातील वातावरण दूषित करू नये.
इंटरनेट सेवा बंद करून आम्ही मागे हटणार नाही. पूर्ण आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. राज्य सरकार मला उठवू शकत नाही.
आमच्याकडून कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होणार नाही. त्याचबरोबर आम्ही आमच्या आंदोलनाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ देणार नाही.
आमचं आंदोलन (Maratha Reservation) अत्यंत शांततेत सुरू आहे. यापुढे देखील आमचं हे आंदोलन शांततेत सुरू राहील. राज्य सरकार महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण का देत नाही? याचं त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला हवं. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायला किती वेळ लागेल? सरकारने हे स्पष्टपणे सांगायला हवं.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मंत्रालयाला बसली मराठा आंदोलनाची झळ; मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड
- Maratha Reservation | मराठा आंदोलन भडकलं; दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसफेऱ्या रद्द
- Weather Update | यंदा थंडी कमीच राहणार; हवामान खात्याने दिला अंदाज
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना अजून काय सोसावं लागेल? बसनंतर मराठा संघटनांचं रेल्वे रोको आंदोलन
- Maratha Reservation | आंदोलकांना त्रास झाला तर जशासतसं उत्तर दिलं जाईल; मनोज जरांगेचा शिंदे- फडणवीसांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











