Share

Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी पेटलेला असताना नेते कोणत्या विकासाचं राजकारण करताय; मनोज जरांगे आक्रमक

🕒 1 min readMaratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांचं हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गावात मराठा समाजाने पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये गाव बंदीचे फलक दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांचं हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटलं आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गावात मराठा समाजाने पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये गाव बंदीचे फलक दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे म्हणाले, “मराठा समाजासाठी (Maratha Reservation) आमचं हे आंदोलन सुरू आहे. आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा महाराष्ट्राच्या गावागावात सुरू आहे.

जर कुणी नेता तुमच्या गावात आला तर त्याला प्रेमाने गावाच्या बाहेर काढा. राजकीय नेत्यांनी देखील जाणून-बुजून आमच्या गावात येऊ नये. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांना मी जाहीरपणे सांगतो की कृपया आमच्या गावात येऊ नका.

नेत्यांनी थोडे दिवस घरी बसून आराम करायला हवा. आतापर्यंत त्यांनी विकास काम केलेले नाही, आता ते काय विकास करतील? आतापर्यंत गावातील रस्त्यावर पडलेले खड्डे त्यांनी बुजवलेले नाही.

त्याचबरोबर आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. अशात यांना यावेळी काय विकास करायचा आहे? तुम्ही आमच्या दारात येऊ नका, त्याचबरोबर आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आमच्या दारात येऊन आमच्या लेकरांचं वाटोळ करत आहात.

सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी विधानसभेत जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. त्यांना मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशन बोलवायला सांगा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या.

त्यांनी बाकीच्या समाजांना आरक्षण (Maratha Reservation) दिलं आहे. मात्र, ते आम्हाला आरक्षण देत नाही. त्यांना आम्ही वेळ दिला होता. परंतु, तरी देखील त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!