Share

Weather Update | नागरिकांनो सावधान! तेज चक्रीवादळामुळे ‘या’ ठिकाणी होणार पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात बहुतांश ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. देशात अनेक ठिकाणी पहाटे गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. अशात अरबी समुद्रामध्ये तेज नावाचं चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. या चक्रीवादळामुळे केरळमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात बहुतांश ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. देशात अनेक ठिकाणी पहाटे गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे.

अशात अरबी समुद्रामध्ये तेज नावाचं चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. या चक्रीवादळामुळे केरळमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर राज्यामध्ये उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

A low pressure area formed in the Bay of Bengal

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ तयार झालं आहे. परिणामी केरळ, ओडीसा आणि पश्चिम बंगालच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

अरबी समुद्रात रविवारी हे वादळ अतिशय तीव्र झालं होतं. या चक्रीवादळामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि बिहारमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, तेज चक्रीवादळामुळे देशात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली असली तरी राज्यात उन्हाचा तडाखा बसणार आहे.

या चक्रीवादळाचा राज्यातील वातावरणावर काही खास परिणाम होणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. राज्यामध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

राज्यात पाऊस नसला तरी बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही