Share

Maratha Reservation | छगन भुजबळ आणि त्यांच्या वयाचा ताळमेळ लागत नाही – मनोज जरांगे

🕒 1 min read Maratha Reservation | जालना: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी या गावामध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभेपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. Related News for Youछगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी या गावामध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभेपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते टीकाटिपणी करताना दिसतात. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरंगे म्हणाले, “छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते एकाच बाजारातले आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी मी जास्त बोलू इच्छित नाही.

ते दोघं काय आहेत, हे संपूर्ण राज्याला माहित आहे. छगन भुजबळ यांचा विषयी आता अत्यंत चिल्लर झाला आहे. लहान मुलाप्रमाणे ते बोलत असतात. त्यांचा आणि त्यांच्या वयाच्या तळमळ जमत नाहीये.

सध्या ते बरळल्यासारखं वागायला लागले आहेत. कारण एवढ्या मोठ्या माणसाला असं वक्तव्य करणं शोभत नाही. त्याचबरोबर त्यांनी आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर बोलायला नको.”

The Maratha society will give a message of peace – Manoj Jarange

पुढे बोलताना ते म्हणाले, “आज दुपारी बारा वाजता आमच्या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेसाठी मराठा समाज शांततेने आला आहे आणि शांततेने घरी जाणार आहे. फक्त राज्य आणि देशाला नाही तर जगाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे.

आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा समाज जमला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आजपासून दहा दिवस आहे.

आम्हाला दहा दिवसानंतर आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. प्रचंड शिकलेला असून देखील मराठा समाज अडचणीत आला आहे. आमच्या सामान्य मराठ्यांची ही लढाई आम्हाला जिंकायची आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही