🕒 1 min read
Vijay Wadettiwar | पुणे: पुणे शहरातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ड्रग्स माफी ललित पाटील फरार झाला आहे. या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
अशात आता या मुद्द्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्द टीका केली आहे. सदर प्रकरणाकडे राज्याचे गृहमंत्र्यांचे लक्ष आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Sassoon Hospital in Pune is a den of criminals – Vijay Wadettiwar
ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा! राज्यात एकीकडे रुग्णालयात मृत्यू संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालय गुन्हेगारांचे अड्डे झाले आहे.
पालकमंत्री पद कुणाला मिळणार या भांडणात पुण्यातील रुग्णालयांमध्ये गुन्हेगारांना आपला अड्डा चालवायला मिळाला आहे. ससून रुग्णालयात राहून अमली पदार्थाचे रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील प्रकरण समोर आले होते.
त्यानंतर ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. ललित पाटील फरार झाला की त्याला पळून जायला कुणी मदत केली होती हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
सदर प्रकरणात पोलिसांवर केलेली कारवाई अपुरी असून येरवडा तुरुंगातील प्रशासकीय अधिकारी, ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे संगनमत असल्याशिवाय हे होणारच नाही. त्यामुळे या प्रकरणाची SIT चौकशी होणे गरजेचे आहे.
सदर प्रकरणाकडे राज्याचे गृहमंत्र्यांचे लक्ष आहे का हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी पुण्याचे पालकमंत्री कोण, उपपालकमंत्री कोण या प्रकरणात न पडता कायदा व सुव्यवस्था प्रश्नांशी सबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि तातडीने SIT नेमून चौकशी करावी.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | ये डर अच्छा है; ‘त्या’ मुद्द्यावरून चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबरपूर्वी करा ‘ही’ काम
- Sanjay Raut | शिवसेनेचा दसरा मेळावा कोणी रोखू शकत नाही – संजय राऊत
- UPSC Recruitment | UPSC मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Uddhav Thackeray | शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा कायम – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











