Share

Chandrashekhar Bawankule | जसं 2024 जवळ येईल तसं अजित पवारांना पुन्हा समर्थन मिळेल – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2024 जस-जसं जवळ येईल तसं-तसं अजित पवारांना (Ajit Pawar) पुन्हा समर्थन मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2024 जस-जसं जवळ येईल तसं-तसं अजित पवारांना (Ajit Pawar) पुन्हा समर्थन मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आज प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे.

येत्या काळात अजित पवार आमची कामं करू शकतात, अजित दादा आमच्या मतदारसंघाचा विकास करू शकतात, असा लोकांचा विश्वास बसला आहे. 2024 जस-जसं जवळ येईल तसं-तसं अजित पवारांना पुन्हा समर्थन मिळेल.”

Eknath Shinde is getting support everyday – Chandrashekhar Bawankule 

पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले “एकनाथ शिंदे (knath Shinde) यांना रोज समर्थन मिळत आहे. मुंबईतील जवळपास 43 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे.

आम्ही एकनाथ शिंदेसोबत जात आहोत, असं साताऱ्याच्या नेत्यांनी देखील मला सांगितलं आहे. उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते, तेव्हा ते जनतेला काहीच देऊ शकले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दररोज जनतेला सांभाळत आहे.

प्रत्येक नगरसेवकाला ते आपल्या पक्षात या म्हणून सांगत आहे. ते त्यांचे कार्यकर्ते सांभाळत आहेत. जे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतात कार्यकर्ते त्यांच्यासोबत जातात.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आमच्या काळात आम्ही आमचं आत्मपरीक्षण केलं आहे. आम्ही जेव्हा सत्तेच्या बाहेर होतो, तेव्हा आम्ही त्यावर विचार केला होता.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही