Share

Ajit Pawar | लवकर अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं लालबागच्या राजाला साकडं

Ajit Pawar | मुंबई: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा हा शपथविधी झाल्यानंतर ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रणजीत … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा हा शपथविधी झाल्यानंतर ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रणजीत नरोटे (Ranjeet Narote) यांनी लालबागच्या राजाला एक नवस केला आहे.

राज्यामध्ये सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अशात अनेक उद्योगपती, अभिनेते, अभिनेत्री, राजकीय मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातात. लालबागच्या राजासमोरला खूप भाविक आपल्या इच्छा आणि नवस बोलून दाखवतात.

अशात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते रणजीत नरोटे यांनी देखील लालबागच्या राजाला एक नवस केला आहे.

लवकरात लवकर अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ द्या, असा मजकूर असलेली चिट्ठी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांच्या या कृत्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Today Ajit Pawar has visited the Lalbagh cha raja

दरम्यान, आज सकाळी (27 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लालबागच्या राजाचं  दर्शन घेतलं आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते.

त्याचबरोबर यावेळी अजित पवारांच्या समर्थकांचा एक गटही या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या चरणी ही चिठ्ठी अर्पण केली आहे. त्यांनी अर्पण केलेल्या चिठ्ठीनंतर अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही