Share

Nana Patole | येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी पत्रकारितेला खरेदी करू पाहताय – नाना पटोले

🕒 1 min read Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 2024 पर्यंत आपल्या विरोधात पत्रकारांनी एकही बातमी छापू नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला समजलं असेल. Related News for You‘उबाठा’ … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

2024 पर्यंत आपल्या विरोधात पत्रकारांनी एकही बातमी छापू नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला समजलं असेल.

त्याचबरोबर त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ऑडिओ क्लिपनंतर विरोधकांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

अशात आता  या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे. येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule should apologize to journalists and public – Nana Patole

ट्विट करत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत!

सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.”

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात खूप चांगलं काम केलं आहे. आम्ही एवढं चांगलं काम करतो, तरी देखील खूप निगेटिव्ह बातम्या पसरवल्या जातात.

त्यांना चहा प्यायला घेऊन जा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि खरी वस्तुस्थिती सांगा. समाजामध्ये पत्रकारांना मोठं स्थान आहे.

त्याचबरोबर आपल्या न्यायव्यवस्थेतील पत्रकार चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, असा सल्ला मी दिला आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा वाईट हेतू नव्हता.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही