Share

Nitesh Rane | रोहित पवार आत्ताशी ‘सिनियर केजी’त – नितेश राणे

Nitesh Rane | नागपूर: भाजप आमदार नितेश राणे आज नागपूर शहरामध्ये दाखल झाले आहे. नागपूरमध्ये दाखल होत असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. रोहित पवार आत्ताशी सिनियर केजीमध्ये आहे, ते अजून शाळेत पोहोचलेले नाही, अशा खोचक शब्दात नितेश राणे … Read more

Published On: 

Nitesh Rane | नागपूर: भाजप आमदार नितेश राणे आज नागपूर शहरामध्ये दाखल झाले आहे. नागपूरमध्ये दाखल होत असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. रोहित पवार आत्ताशी सिनियर केजीमध्ये आहे, ते अजून शाळेत पोहोचलेले नाही, अशा खोचक शब्दात नितेश राणे यांनी रोहित पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Rohit Pawar is starting to come out of the egg now – Nitesh Rane

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना नितेश राणे म्हणाले, “रोहित पवार आत्ता कुठे अंड्याच्या बाहेर यायला लागले आहे. ते अजून सिनियर केजीमध्ये आहे. अजून ते शाळेत पोहोचलेले नाही. त्याचबरोबर अजून त्यांना कंठ फुटलेला नाही.

अगोदर अनुभव घ्या, प्रणेती  शिंदे काय बोलल्या आहे, याकडे त्यांनी लक्ष घ्यावं. इकडं-तिकडं फिरण्यापेक्षा थोडं त्यांनी कर्जतमध्ये लक्ष घ्यावं, म्हणजे त्यांच्यावर माजी आमदार ही पाटी लावण्याची वेळ येणार नाही.”

गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. नितेश राणे म्हणाले, “संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांच्या मालकानं मराठा आरक्षण घालवलं आहे.

संजय राऊत यांना मराठा समाजाच्या मोर्चात बोलायला दिलं नव्हतं. त्यांच्या हातात चुकून माईक दिला असता तर कुठे घातला असता हे कळलं पण नसतं. त्यांच्याच मुखपत्रात मुका मोर्चाचे कार्टून छापणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही