🕒 1 min read
Sadabhau Khot | सातारा: मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यात उपोषण करत आहे.
याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यात आणि शरद पवार गटात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sharad Pawar will have to fast in Azad Maidan – Sadabhau Khot
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार उलथून टाकलं आहे.
म्हणून शरद पवार एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचे आरोप करताना दिसत आहे. 2004 मध्ये बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. त्यांनी तो निर्णय का स्वीकारला?
त्यानंतर गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे पुरावे जमा केले होते. त्या पुराव्यांच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं.
मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण घालवलं आहे. मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली आहे. हे पाप फेडण्यासाठी शरद पवारांना आझाद मैदानात उपोषण करावं लागणार आहे.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मराठा समाजाला आता शब्द आणि दिशाभूल नको आहे. मराठ्यांना आता ठोस आरक्षण पाहिजे आहे.
मराठा समाजाला कसं आणि किती आरक्षण देता येईल? यासाठी सरकारकडे एक आराखडा असतो. त्या आराखड्यावर सरकारने आंदोलकांशी हिमतीने आणि विश्वासाने चर्चा करून मार्ग काढायला हवा.
मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसींचा पाठिंबा आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. दोघांची भांडण लावून तिसरी माणसं गंमत पाहतील, हे राज्याला आता नको आहे. राज्याला सध्या शांतता आणि स्थैर्य हवं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे
- Maratha Reservation | मराठा उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली; आणखीन एक मराठा आंदोलन पेटणार?
- Radhakrishna Vikhe Patil | धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करणं पडलं महाग; विखे पाटलांविरुद्ध धनगर समाज आक्रमक
- Shambhuraj Desai | मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा देणार – शंभूराजे देसाई
- Uddhav Thackeray | महागाई वाढत असताना राज्यातील सत्ताधारी आत्मनंदात मग्न; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











