Share

Bacchu Kadu | दिव्यांगांना निधी दिला नाही, तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू – बच्चू कडू

Bacchu Kadu | नंदुरबार: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. दिव्यांगांना पुरेसा निधी दिला नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू, असं … Read more

Published On: 

Bacchu Kadu | नंदुरबार: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. दिव्यांगांना पुरेसा निधी दिला नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

The state government does not spend 5% of the income fund for the disabled – Bacchu Kadu

नंदुरबार जिल्हात दिव्यांग मेळाव्यात बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू म्हणाले, “दिव्यांग लोकांच्या विकासासाठी सरकारने दिव्यांग विकास निधी खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू.

राज्य सरकार उत्पन्नाचा 5% निधी दिव्यांगांसाठी खर्च करत नाही. तो निधी राज्य सरकारला खर्च करावा लागेल. कोणतीही व्यक्ती दिव्यांग जन्माला येऊ नये असं मला वाटत असतं. एखादी व्यक्ती जन्माला दिव्यांग आली तर त्याचा दिव्यांगपण कसं जाईल, याबाबत मी सातत्याने विचार करत असतो.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, “कोणत्याही घोषणा करून आरक्षण मिळत नाही. संवैधानिक मार्गाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अभ्यासक कमिटी निवडून योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

त्याचबरोबर या कमिटीच्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसावा. मराठा समाजाला विश्वासात घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही